महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे परिसरात आदरांजलीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात राज्याचे मंत्रिमहोदय भरत शेठ गोगावले यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवास विनम्र अभिवादन केले.
महाड शहराचे आणि रायगड जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चवदार तळ्याच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता.यावेळी मंत्री महोदय भरत शेठ गोगावले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.याप्रसंगी त्यांच्यासोबत तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच, महाड शहर व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह अभिवादन केले.प्रामुख्याने, हजारो भीमसैनिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांच्या कार्याला वंदन करून आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी चवदार तळ्याचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महामानवाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

