रोहा अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 – महत्त्वाची बातमी…

0
4

रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

फेरी क्रमांक 2 नंतर रोहा अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार *वनश्री शेडगे* यांनी भक्कम आणि निर्णायक आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये त्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा *2348 मतांनी आघाडीवर* असून, रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहरातील विविध भागांत आनंद व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून पुढील फेऱ्यांमध्ये निकाल कसा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहा अष्टमी नगरपरिषद निवडणूक ही स्थानिक विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि भविष्यातील शहराच्या वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पुढील फेऱ्यांमध्ये मतांची आकडेवारी आणखी स्पष्ट होणार असून, अंतिम निकाल काही वेळातच समोर येण्याची शक्यता आहे.