मानसी दळवी व रसिका केणी, रायगड जिल्हा परिषद गाजविणार शिवसेनेच्या  दोन वाघिणी… रायगडात शिवसेना(शिंदे)पक्षातभाजप व शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश…

0
3

 रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीये.रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार नेतेगण व कार्यकर्त्यांनी केलाय. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रायगड आंबेपूर (कुर्डुस) जिल्हापरिषद गट क्र.३१ कार्यकर्ता संवाद मेळावा व आढावा बैठक भरगच्च उपस्थितीत  आज पोयनाड येथे पार पडली. यावेळी कुर्डुस जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार सौ.रसिका राजा केणी यांच्या नावाची घोषणा करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्याना केले. रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी व रसिका  केणी या दोन रणरागिणी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून दाखवतील असा विश्वास यावेळी व्यक्त  करण्यात आला.

संवाद मेळाव्यात भाजप व शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी,माजी सभापती दिलीप भोईर, रसिका केणी यांची प्रमुख  उपस्थिती होती. या आढावा बैठकीस युवक, युवती , महिला व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची  लक्षनीय उपस्थिती होती.