रजनी जाधव यांच्या गायरान काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

0
4

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी जिल्हा रायगड आणि शारदा प्रकाशन यांच्यातर्फे रायगड कन्या कवयित्री रजनी जाधव यांच्या “गायरान” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक २५/१/२०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र अंधेरी ( पश्चिम) येथे सुप्रसिद्ध साहित्यिका उर्मिला पवार यांच्या हस्ते तर सुप्रसिद्ध साहित्यिक ज.वि.पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात सधम्म मासिकाचे संपादक प्रा.आनंद देवडेकर,प्रा.विजय मोहिते, सुप्रसिद्ध साहित्यिक सुनील हेतकर,कवयित्री छाया कोरेगावकर, प्रकाशक प्रा.डॉ. संतोष राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या प्रकाशन सोहळ्यास साहित्य रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे,असे आवाहन प्रा.डॉ.संजय हिराजी खैरे अध्यक्ष,अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी जिल्हा रायगड यांनी केले आहे. रजनी जाधव ह्या मूळच्या महाड तालुक्यातील जुई या गावच्या आहेत. गावातील शेती भाती निसर्ग यांच्याशी त्यांचे अतूट नाते आहे. त्यांच्या या काव्यसंग्रह प्रकाशनाची सर्वांच्या मनात आतुरता आहे.