महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
संविधान गुण गौरव समिती व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षेचे आयोजित २६ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रीय स्मारक येथे पार पाडण्यात आला. तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.श्री.रमेश तडवी सर,तसेच तांत्रिक विभागाचे (बार्टी पुणे) मा. श्री. राजेंद्र वाबळे सर,पोलिस विभागाचे श्री.राम कांदे व श्री.राहुल येळे,राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापक श्री. प्रकाश जमधाडे सर,माहिती व जनसंपर्क अधिकारी लिना किर्तीकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होवून संविधान प्रास्ताविकेचे वाचनाने झाली.प्रमुख पाहुणे मा.तडवी सरांनी स्पर्धा परिक्षा करणार्या विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले.राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक यश अनिल जाधव,दुसरा क्रमांक आप्पासो वसंत लवटे, तृतीय क्रमांक ओम एकनाथराव झाकर्डे या विद्यार्थीनी मेडेल पटकावले.सर्व सहभागी विद्यार्थींना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.दरवर्षी संविधान गुण गौरव परिक्षा सहभागी म्हणून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक,महाड यांना प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच निस्वार्थ सेवेसाठी केंद्रप्रमुख लिना किर्तीकर यांना देखिल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. या परीक्षेसाठी राज्यभरातून भरपूर प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये संविधान जनजागृती महत्व पटवून देणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून संविधान गुण गौरव परिक्षा दरवर्षीप्रमाणेच यंदा ही पार पाडण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क अधिकारी लिना किर्तीकर यांनी केले.कार्यक्रमासाठी सुजाण नागरिक मंच व संविधान गुण गौरव समितीचे संविधान प्रचारक मा.श्री.विलास पवार व मा.श्री.नुरखाॅ पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी स्मारकातील सर्व कर्मचारी ग्रंथालयातील विद्यार्थ्यी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.लिना किर्तीकर यांनी आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली…

