सापे वामने नडगांव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था महाड… 

0
3

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

          या संस्थेच्या प्रयत्नाला अखेर यश गेले बरेच दिवस प्रलंबित असलेल सापे – वामने रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला आपल्या राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय नामदार मा. श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांच्या वतीने हे काम पूर्ण होणार सदर कामाचा शुभारंभ आदरणीय मंत्री महोदय यांनी श्रीफळ वाढवून केला.

                  सदर कार्यक्रमास नवनिर्वाचित जिल्हापरिषद सदस्य श्री. निलेश ताठरे साहेब व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री. संदीप खिडबीडे साहेब, शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री. अनंत सावंत साहेब, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास (पप्या) आंबवले, युवासेना संपर्क प्रमुख श्री. विनय बटावले आणि या संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिल जाधव, उपाध्यक्ष श्री. रामचंद्र आग्रे, सचिव श्री. अनंत जाधव, सहसचिव श्री. सत्यवान रसाळ खजिनदार श्री. बळीराम जाधव, सदस्य श्री. नामदेव घाणेकर, श्री. प्रविण साळवी (माजी सरपंच वामने) श्री. अनिल कजबिले (पोलिसपाटील नडगांव) श्री. अशोक बैकर (सरपंच वामने) तसेच या संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद त्यांचबरोबर रावढळ गावचे सरपंच श्री. नामदेव रेशीम, श्री. जयसिंग जाधव (शाखाप्रमुख वामने) रिक्षा चालक संघटनेचे प्रमुख श्री. दीपक साळवी, समिर जाधव व कोकण रेल्वेचे प्रमुख अधिकारी कर्मचारीवर्ग त्याच प्रमाणे जाधव भावकीचे मुबंई पुणे वरून आलेले चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.