चवदार तळे सौंदर्य करण्यासाठी मंत्री भरत शेठ यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद; मोहन खांबे आरपीआय तालुकाध्यक्ष…

0
4

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-

महाड शहरातील ऐतिहासिक क्रांतीचे ठिकाण असणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाच्या पुढील वर्षी होणाऱ्या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनामार्फत चवदार तळे सौंदर्यीकरण व पाणी स्वच्छतेसाठी 55 कोटी 19 लक्ष रुपये मिळून देण्यात मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केलेल्या योगदानाबद्दल बौद्ध समाज महाड व आरपीआयच्या वतीने त्यांना धन्यवाद देत असल्याची प्रतिपादन आरपीआय तालुका अध्यक्ष मोहन खांबे यांनी आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रायगड प्राधिकरण प्रमाणेच महाड क्रांतिभूमी प्राधिकरण शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करावे तसेच महाड शहरात तथागत गौतम बुद्धांचा भव्य पुतळा उभारावा अशी मागणी केली. रावढळ येथील गोपाळ वलंगकरबाबा यांच्या संदर्भातही शासनाने लक्ष देऊन स्मारक निर्माण करावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. महाडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला आरपीआय सह महाड तालुक्यातील बौद्ध समाज व विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील वर्षी समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या 20 मार्च च्या महाड दौऱ्यात दरम्यान महाड बौद्ध समाजाच्या वतीने शासनाकडून शतकपूर्ती वर्षा निमित्त विशेष आर्थिक पॅकेज देण्याची करण्यात आलेल्या मागणीची पूर्तता यानिमित्ताने होत असल्याचे नमूद करून यापूर्वी प्राप्त झालेले सात कोटी रुपये अपुरे ठरतील हे लक्षात घेऊन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी यामध्ये 55 कोटी 79 लाख 85 हजार 653 रुपयांचे नवीन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाड तालुक्यातील तमाम बौद्ध समाज बांधवांकडून त्यांना धन्यवाद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मंत्री भरत शेड गोगावले यांनी ज्या गावात बौद्ध वाडी त्या गावात बौद्ध विहार अशी केलेली घोषणा आता जवळपास पूर्णत्वा जात असून प्रत्यक्षात 35 ते 40 गावांमधून बौद्ध विहार अशी कामे प्रगती पथावर असल्याचे त्यांनी नमूद केले बौद्ध समाजाच्या विविध कार्यक्रमाकरिता व आंबेडकरी जनतेसाठी मंत्री गोगावले यांचे नेहमीच सहकार्य राहिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंती निमित्त देशातील सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याच्या शासनाच्या धोरणानुसार चवदार तळे संदर्भात घेण्यात आलेल्या या निर्णयाचे पुढील वर्षीच्या शंभर वर्षे पूर्ण होणाऱ्या सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर महत्त्व असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले मंत्री गोगावले यांनी यासंदर्भात समाजाकरता केलेल्या योगदानाबद्दल जिथे तमाम आंबेडकर जनतेच्या वतीने आपण त्यांना धन्यवाद देत असल्याचे नमूद केले.

बौद्ध समाजाचे ज्येष्ठ नेते विनायक हाटे यांनी मागील वर्षी नामदार शिरसाट यांच्या दौऱ्यामध्ये चवदार तळे मधील पाणी स्वच्छता सौंदर्यीकरण करण्याबाबत तसेच अमृतसरच्या धर्तीवर ती ओझोन चा वापर करून पाणी स्वच्छ करण्याच्या योजनेस संदर्भातील केलेल्या सुटूवाच्याला सात कोटी रुपये कमी पडतील म्हणून नव्याने प्राप्त झालेला निधी हा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले 23 फेब्रुवारी रोजी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्या दालनामध्ये दुपारी दीड वाजता 14 तळे सत्याग्रहाच्या शंभर वया वर्षानिमित्त आयोजित विशेष बैठकीमध्ये शासकीय प्रतिनिधी व सामाजिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यामध्ये या निधीचा विनियोग कशा पद्धतीने करायचा त्याचा आराखडा तयार करून मंजूर केला जाईल असा विश्वास व्यक्त केला सामाजिक जाणिवेतून घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांनी दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद दिले.

या पत्रकार परिषदेला आरपीआय तालुका अध्यक्ष मोहन खांबे यांसह समाजाचे ज्येष्ठ नेते विनायक हाटे 24 च्या जयंती दिनाच्या अध्यक्ष विजय साळवी, बौद्ध महासभाचे सुनील जाधव ,दीपक कासारे ,उपाध्यक्ष अशोक मोहिते, बाळाराम धोत्रे, सखाराम जाधव, विन्हेरे येथील रवींद्र धोत्रे, भीमराज साळवी, नरेश साळवी, लक्ष्मण जाधव ,यांसह गंगाराम भोसले ,सुनील पवार ,सिद्धार्थ सकपाळ, योगेश कासारे, ज्येष्ठ नेते केशव हाटे या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर या मान्यवरांनी मुंबईत होणाऱ्या समाज कल्याण मंत्री ना संजय शिरसाट यांच्या सोबतच्या भेटी संदर्भात त्यांना द्यावयाच्या पत्राबाबत मसुदा तयार करणार असल्याची माहिती दिली.