रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
खेळांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण खेळ आपण या अगोदर पाहिलेत,मात्र खेळी नारळ फोडणीचा खेळ आपण कधी पाहिलात का? तर कोकणात अशीच अनोखी खेळी नारळ फोडीची स्पर्धा आता रंगणार आहे…नागावच्या मनमोहक नयनरम्य समुद्र किनारी भरणाऱ्या या नारळ फोडीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार ?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे…या स्पर्धेत रायगड मुंबईसह तळ कोकणातील अनेक स्पर्धक सहभाग घेणार आहेत…डॉ.सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाने या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केलीय…त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारणार ?हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल…या स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धक व प्रेक्षकांनी सहभाग दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन डॉ.सचिन राऊळ यांनी केलेय.या स्पर्धा येत्या रविवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 नंतर भरविल्या जाणार आहेत…या नारळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क विपुल राऊळ 7798642214 तसेच शैलेश नाईक 9850231595 यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले.