पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-
मुंबई- गोवा महामार्गावरील लपेटा आणि चविष्ट मांसाहारासाठी प्रसिद्ध असलेल्या साईकृपा ढाब्याच्या किचन कॅप्टनची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे…
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बुधवार दि.७ ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील शिरढोणनजीक असलेल्या झाडी झुडपात श्रीसंता दास रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत एका व्यक्तीला आढळून आला…सदर व्यक्तीने घटनेची माहिती पोलिसांना दिली…घटनेची मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी भेट दिली…त्याठिकाणी श्री संता दास वय वर्ष ४५ मूळ राहणार ओडिसा याचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे दिसून आले … शरीरावर अन्य ठिकाणीही शस्त्राचे वार आहेत … श्रीसंता दास हा शिरढोण येथील साई कृपा हॉटेल येथे किचन कॅप्टन म्हणून काम करत होता… त्याच्या हत्येबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत…याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे … पोलिसांनी तपासाच्या दिशेने चक्र फिरवली असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल…अशी माहिती नितीन ठाकरे यांनी दिली …
एकंदर पाहता मुंबई-गोवा महामार्गालगत अनेक गुन्हे घडत आहेत..याआधी दरोडेही पडले…तसेच पंजाबी पॅलेट पनवेल येथील वेटरच्या हत्येचा प्रकार घडला होता …एवढे गुन्हे घडत असताना देखील पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याची लोकांची ओरड आहे…त्यामुळे रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त वाढवावी…अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत…