महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे ):-
महाड तालुक्यातील दासगाव खाडी पट्ट्यात डोंगर माथ्यावर वसलेली चिंभावे धनगरवाडी आहे… ही धनगरवाडी सोशल मिडीयामुळे चर्चेत आली आहे…गावात एक दुर्दैवी प्रकार घडला… दि.09 ऑगस्ट 2024 रोजी चिंभावे धनगरवाडी गावचे रहिवाशी दिपेश विठ्ठल माने यांचा मानपाडा येथे आकस्मिक मृत्यू झाला…त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी चिंभावे धनगरवाडी येथे आणण्यात आला…चिंभावे गावातून धनगरवाडीत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने तेथील ग्रामस्थांनी मोठया अडचणीचा सामना करीत मृतदेह चक्क डोलीच्या सहाय्याने 2 ते 3 किलोमीटर घनदाट जंगलातून पाय वाटेने पावसातून दगडधोंड्यातून घरी नेला…सोशल मिडीयावरून ही माहिती प्रसारीत झाल्यानंतर एकच खळबळ उडाली…या वाडीतील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या गरोदर महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात घेऊन जायचे असेल,तर डोली अथवा खांद्यावर उचलून 2ते 3 किलोमीटर जंगलातून पायवाटेने चालावे लागते. कित्येक वर्षे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या भागाला रस्ता मिळालेला नाही… वाडीची एकूण लोकसंख्या 150 असून कित्येक वर्ष रस्ता नसल्याने मुलांना शाळेत जाण्यासाठी रोज दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते …