कर्जत शिवसत्ता टाइम्स (नरेश जाधव):-
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात टिळक चौक कर्जत येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून बेमुदत साखळी उपोषण म्हणजेच “एक दिवस स्वतःसाठी एक दिवस कर्जत तालुक्यासाठी”. आज सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता टिळक चौक कर्जत येथे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आयोजित करण्यात आले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून कर्जत तालुक्यातील सर्व सामान्य जनता महावितरणच्या सुरू असलेल्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून सतत लाईटच्या होणाऱ्या बिघाडामुळे समस्त नागरिक होरपळून निघाले असून अनेक वेळा तक्रारींसह आंदोलन, उपोषण करून देखील त्याचा महावितरणच्या अधिकरी यांच्यावर काही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराविरोधात कर्जत तालुक्यातील जनतेच्या मनात महावितरण विरोधात जन आक्रोश निर्माण झाला असून अधिकारी देखील या बाबतीत गांभीर्याने घेत नसल्याने अनेक पत्र व्यवहार करून देखील कोणताच उपाय होत नसल्याने आज टिळक चौक कर्जत येथे महावितरण कारभाराविरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यावेळी कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीचे ॲड.कैलास मोरे, राजेश भगत, रंजन दातार, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, अनिल भोसले, कृष्णा जाधव, मालु निरगुडा, नितिन परमार, प्रभाकर गंगावणे, शिवाजी शिंदे, प्रशांत उगले आदि सदस्य उपस्थित होते. तर आज दि. १२ ऑगस्ट रोजी उपोषणास ॲड. संदिप घरत मोहिली, राजेश मिरकुटे नेरळ, ॲड. चंद्रा प्रताप चव्हाण, माजी नगरसेविका माथेरान, सौ. अस्मिता सावंत कर्जत, हरेश सोनावळे केळवली, मल्हारी माने आमराई, ऋषिकेश भगत चिंचवली, विशाल कोकरे कर्जत, राकेश डगळे कर्जत, रविंद्र क्षिरसागर गुंडगे, मुकेश पाटील माजी नगरसेवक कर्जत, हेमंत बडेकर वेणगाव, कृष्णा पवार कर्जत, दिलिप शिंदे कशेळे, संतोष मुने पिंपळोली, मनोज पाटील पोलीस पाटील संघटना अध्यक्ष, तुषार बडेकर वेणगाव, अजय ठमके धोत्रे आदी तालुक्यातील नागरिक उपोषणास बसले आहेत.