पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदीप मोकल):-
भगवा सप्ताहानिमित्त पेण तालुक्यात शिवसेनेचा झंजावात दिसून आला… तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसैनिक नोंदणीचा जनतेत मोठा उत्साह दिसून आला…आंदोलनसम्राट विष्णुभाई पाटील ,नरेश गांवड,अविनाश म्हात्रे,दीपश्रीताई आदींच्या सहभागाने गावोगावच्या सभा यशस्वी झाल्या…उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वाढीसाठी एकजुटीने प्रयन्त करा…घरा-घरात प्रचार झाला पाहिजे … उध्दवसाहेबांचे हात बळकट करा…या मतदार संघाचा विकास करायचा असेल तर आपला लोकप्रतिनिधी पाहीजे… शिवसैनिक नोंदणीचा उत्साह पाहून याचा फायदा महाविकास व इंडिया आघाडीला होईल… असे शिवसेनेचे रायगड जिल्हा संर्पक प्रमुख व आंदोलनसम्राट विष्णुभाई पाटील यांनी खारपाले येथे मार्गदर्शन करताना सांगितले… उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आयोजित भगव्या सप्ताहानिमित्त पेण तालुक्यातील खारपाले येथे शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते…यावेळी रायगड जिल्हा संर्पक प्रमुख विष्णुभाई पाटील, पेण विधानसभा संर्पक प्रमुख चद्रकांत गायकवाड, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गांवड, पेण विधानसभा समन्वयक शिशिर धारकर, जिल्हा महिला संघटीका दिपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटीका दर्शना जवके,उपतालुका प्रमुख हिराजी चोगले,कासु विभाग प्रमुख गजानन मोकल, कासु विभाग युवा सेना अधिकारी निशांत पाटील , लक्ष्मण खाडे बी.एच. पाटील, आदिसह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली…सरकारने घोषणा केल्यात परंतु त्या कार्यान्वित झाल्या नाहीत… ही जनतेची फसवणुक आहे. येथिल विधासभेचा उमेदवार लवकर जाहीर करावा अशी नरेश गावंड यांनी मागणी केली… पेण विधानसभा संर्पक प्रमुख चद्रकांत गायकवाड, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गांवड, पेण विधानसभा समन्वयक शिशिर धारकर, जिल्हा महिला उपजिल्हा संघटीका दर्शना जवके यांनीही आपले विचार बैठकीत मांडले…