रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पिंपळोली नागाव हे गाव प्रामुख्याने सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. माञ देशवासीयांची सेवा करणाऱ्या हेच सैनिकांचे गाव आता असुरक्षित झाल्याचे चित्र समोर आले आहे. याचे कारण येथील गावांना जोडणारा आणि वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नदी पूल अतिशय जीर्ण आणि धोकादायक स्थितित आहे. अखेरची घटका मोजणारा हा पुल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती येथील गावकरी व्यक्त करतायेत, पुलाचे मुख्य संरक्षक कठडे नदीत तुटून पडल्याने प्रवासादरम्यान एखादे वाहन या पुलावरुन घसरून नदीत कोसळण्याची भिती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे… ऐन पावसाळयात पुलाला दहा फुटहून अधिक उंचीच्या पाण्याचा वेढा असतो.आणि त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन जवळजवळ 10 गाव आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो…वारंवार लेखी पत्रव्यवहाराद्वारे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देखील शासन प्रशासन सरकार अद्याप कोणतेही सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे…सरकारने लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन या गावाला वर्षानुवर्षे भेडसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी जोर धरत आहे…