उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
विधानसभा निवडणूक अगदी समीप आल्याने कोकण विभागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस,शेकाप आणि अन्य मित्रपक्ष उमेदवारींसाठी सक्रिय झाले आहेत…कोकणातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघावर दावे होत आहेत…काँग्रेसकडून मात्र एकाही मतदारसंघावर जोरदार दावा झालेला नाही… विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत… तरीही महाविकास आघाडीतील सहभागी पक्ष आपापला दावा मतदारसंघावर करीत आहेत…यामध्ये उबाठा शिवसेना आणि शेकाप आघाडीवर आहे… काँग्रेस पिछाडीवर दिसत आहे…महाविकास आघाडीतून कोकण पदवीधरची उमेदवारी काँग्रेसच्या रमेश किर यांना देण्यात आली होती…त्यात त्यांचा सडकून पराभव झाला…कोकणात रमेश किर यांचे कर्तृत्व शून्य आहे… ते ज्या विभागात राहतात… त्या रत्नागिरीतही त्यांची व्यक्तीगत माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून अजिबात ताकद नाही…माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखांची रमेश किर यांच्यावर विशेष मर्जी होती… त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात रमेश किर यांना काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते…जिल्हाध्यक्षपद मिळूनही रमेश किर विशेष छाप पाडू शकले नाहीत… त्यांनी काँग्रेस वाढविली नाही… तर होती ती काँग्रेस संपविली…असा त्यांच्यावर नेहमी आरोप होतो… काँग्रेसचा एक कार्यकर्ताही त्यांचा समर्थक नाही.. कोकण पदवीधरची उमेदवारी रमेश किर सोडून अन्य कोणाला दिली असती… तर वेगळे चित्र दिसले असते… अलिबागचे ऍड. प्रवीण ठाकूर कोकण पदवीधरला इच्छुक होते…त्यांनी याआधी लोकसभा निवडणूकही लढविली होती… त्यांना दांडगा अनुभव होता… मात्र त्यांचा पत्ता कट करून काँग्रेसला आमदारकी मिळू दिली नाही… महाविकास आघाडीचे समीकरण पाहता काँग्रेसला एक संधी देण्यात आली… मात्र त्यांनी ती गमावली… त्यामुळे विधानसभेला काँग्रेसचा विचार होईल असे वाटत नाही… कारण कोकणात म्हणजेच पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काँग्रेस नावाला शिल्लक आहे… महाविकास आघाडीतील सहभागी इतर पक्षांची काँग्रेसपेक्षा अधिक ताकद कोकणात आहे…त्यामुळे रमेश किर यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसने थंड बसावे अशीच अपेक्षा महाविकास आघाडीची दिसून येत आहे… याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आवाज उठविण्याची गरज आहे… कोकणात उरण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे…उरण विधानसभेसाठी शिवसेना आणि शेकापात रस्सीखेच आहे… दोघांच्या भांडणात भाजपा महायुतीचा फायदा होईल… त्यामुळे उरण विधानसभा काँग्रेसला दिल्यास महाविकास आघाडी बाजी मारेल… शेकाप आणि शिवसेनेला शांत करता येईल…जसे कोकण पदवीधारला शिवसेनेला उमेदवार किशोर जैन यांना शांत करण्यात आले… उरण मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला तिकीट मिळण्यासाठी सर्व काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे…