Thursday, November 21, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडइंडिया शेतकरी,कष्टकरी,आणि आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेसाठी योगदान देण्यास तत्पर...

इंडिया शेतकरी,कष्टकरी,आणि आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेसाठी योगदान देण्यास तत्पर…

श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी):-

       बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक श्री. सुब्रत कुमार यांनी नुकतीच अलिबागला भेट दिली… अलिबाग शाखेला भेट देऊन ग्राहक ,कर्मचारी वर्ग, रायगड विभागीय कार्यालय आणि रायगड जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखा अधिकाऱ्यांशी संवाद साधला…यावेळी त्यांच्यासोबत मुंबई समूहाचे महाप्रबंधक श्री.सुब्रत कुमार रॉय हेही उपस्थित होते…यादरम्यान मार्गदर्शन करताना त्यांनी सर्व शाखाधिकाऱ्याना विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले…ग्राहकांचे हित जोपसण्यासोबत,ग्राहक सेवा उंचवण्यावर तसेच समाजाच्या सर्व घटकापर्यंत बँकेच्या सर्व सुविधा पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांनी भर दिला…यावेळी रायगड विभागाचे विभाग प्रमुख श्री.मुकेश कुमार , उपविभाग प्रमुख श्री. बिरेन चॅटर्जी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले…जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक श्री.विजयकुमार कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले…कृषी विभाग प्रमुख श्री.सुधिर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले…मान्यवरांच्या हस्ते विविध ग्राहकांना कर्ज वितरण करण्यात आले…कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासन आणि सेवा विभाग प्रमुख श्री.विजय जाधव , विभागातील अधिकारी श्री.विकास म्हेत्रे , श्री.लोकेश सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments