रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
रोह्यातील सानेगाव व यशवंतखार गावाच्या जंगल भागात दिनांक 12 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गोहत्या झाल्याचा प्रकार नागरिकांनी समोर आणला होता. यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वीच येथे गोहत्या करण्यासाठी येणाऱ्या होंडा सिटी वाहनाला व आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतु एकाचवेळी जवळपास सात गाई व बैलांची कत्तल करण्यात आली होती… यामुळे संपूर्ण रोहा हादरून गेला होता. सर्व स्तरावर याचा निषेध सुद्धा दर्शविण्यात येत होता. रोहा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधाकरिता विशेष पथक नेमून शोध मोहीम सुरू केले होते. अवघ्या 24 तासाच्या आतच पोलिसांना यामध्ये यश आले आहे…मुंबईतील गोवंडी विभागातून अनिस पटेल या नावाच्या आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ देखील ताब्यात घेतली आहे…विश्व हिंदू परिषदेकडून सुद्धा रोहा पोलीसांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते…