उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर माजी आमदार असूनही लोकांवरील अन्यायाला वाचा फोडताना नेहमी दिसतात… हे काम खरे तर भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांचे आहे… मात्र आमदार महेश बालदी तसे करताना दिसत नाहीत… अशी उरण विधानसभा मतदार संघातील जनतेची ओरड आहे… येथील ज्युली पार्किंगजवळ रिक्षाला झालेल्या अपघातात मृत झालेल्या इसमाच्या कुटूंबियांना मनोहरशेठ भोईर यांनी ११ लाखांची मदत मिळवून दिली… यावेळी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात आमदार महेश बालदी कोठेही दिसून आले नाहीत… याउलट माजी आमदार मनोहरशेठ भोईर तेथे ठाण मांडून होते…
उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीतील ज्युली पार्किंगजवळ मालवाहू ट्रेलरने एका रिक्षाला धडक दिल्याने बुधवार दि.७ ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला होता… अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या केळवणे येथील भरत ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला… रिक्षाचालक आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला… रिक्षाचा पूर्ण चेंदामेंदा झाला…अपघात करणाऱ्या ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले… याविरोधात स्थानिकांनी जोरदार आवाज उठविला… अपघात झालेल्या अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा म्हणून ग्रामस्थांनी रस्त्यावर बसून जेएनपीए हायवे जाम केला…घटनेची माहिती मिळताच उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर घटनास्थळी दाखल झाले…अपघातग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय हलणार नाही असा इशारा देत माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ देखील ठाण मांडून बसले… अपघात करणाऱ्या ट्रेलर चालकाच्या मालकाकडून मृत भरत ठाकूर यांच्या कुटुंबियांना ११ लाख रुपयांची मदत मिळवून दिल्यानंतर माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी आंदोलन स्थगित केले… अपघातात जखमी झालेल्या दोघांना देखील मदत केली… मनोहरशेठ माजी आमदार असूनही लोकांवरील अन्यायाला वाचा फोडताना दिसतात… हे काम खरे तर भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांचे आहे… आमदार महेश बालदी यांची प्रशासनावर पकड नसल्याने महसूल, आरोग्य, पोलीस, वाहतूक आदी शासकीय यंत्रणा बेफाम झाल्या आहेत… त्यामुळेच उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था, वाहतुककोंडी आदी समस्या आवासून उभ्या आहेत… त्यातूनच अपघातासारख्या समस्या घडून लोकांचे जीव जात आहेत…