नागोठणे शिवसत्ता टाइम्स (अनिल पवार):-
नागोठणे ते लोणेरे दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे,अपूर्ण अवस्थेत असलेले उड्डाणपूल आणि अपूर्ण अवस्थेत असलेले माणगाव आणि इंदापूरचे बायपास मार्ग हे पूर्ण करून मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत करा…अन्यथा 17 ऑगस्ट रोजी सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित मंत्री मुख्यमंत्री खासदारांना देण्यात आले होते…या पत्राची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायगड प्रेस क्लबला पत्र पाठवले असून त्या पत्रामध्ये खड्डे भरण्याचे काम सुरू केले असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देऊन आपण पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे… अशी विनंती राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायगड प्रेस क्लबला केली आहे…दरम्यान या पत्राचा विचार करून तसेच सुरू केलेले काम पाहून 17 ऑगस्टचे आंदोलन थांबवण्यात आले असल्याचे जाहीर केले… पण जर येत्या पंधरा दिवसात रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम तसेच पडलेले खड्डे भरून रस्ता सुस्थितीत केला नाही तर रास्ता रोको करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रोहा येथील रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिला…
या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर,कोकण विभागीय सचिव अनिल भोळे,रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे,उपाध्यक्ष मोहन जाधव,सचिव अनिल मोरे,खजिनदार दरवेश पालकर,माजी अध्यक्ष अभय आपटे,भारत रांजणकर,बी.एस.कुळकर्णी, राजेंद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते…