रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत ):-
शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नागोठणे ग्रामपंचायत सभागृहात युवक युवती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते…शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्यावतीने आयोजित केलेल्या युवक युवती मार्गदर्शन आणि शाळा वाचवा अभियान कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार तथा मास्टर ऑफ आर्किटेक लंडन श्री अतुल म्हात्रे व शिवश्री ॲड. रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष शिवराज्य संघटना )यांनी प्रमुख मार्गदर्शन केले…त्यानंतर शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अतुल नमिता नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान दादर पेण या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन केले…यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतुल नंदकुमार म्हात्रे (मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन)यांनी मौलिक मार्गदर्शन केले… कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवश्री ॲड. रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष शिवराज्य संघटना )यांनी भूषविले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सतिश नारायण सुटे (सभासद) हे होते. या कार्यक्रमास ज्ञानेश्वर पांडुरंग सुर्यवंशी, ह.भ.प. दगडू महाराज दळवी,(रायगड भुषण), धम्मशिल सावंत ( पत्रकार ), ह.भ.प. दिलीप महाराज शिंदे(रायगड भुषण), भन्ते आधिचित्तो, ह.भ.प. महेश महाराज पोंगडे (अध्यक्ष सत्यशोधक वारकरी महासंघ रायगड), ह.भ.प. आशिष महाराज जाधव (श्रीक्षेत्र भंडारा डोंगर, देहू), शिवश्री विकी कदम (प्रवक्ते), शिवश्री हिमांशु पाटील (सचिव), शिवश्री डॉ. धनाजी सुरोसे (संपर्कप्रमुख), शिवश्री विराज जाधव (संघटक), शिवश्री अनिल सानप रायगड जिल्हाध्यक्ष,उद्योजक भगवान बिनेदार, रिपाइं रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड,महेंद्र ठाकूर सरपंच बोर्जे, निलेश म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य वडखळ, राजन झेमसे सामाजिक कार्यकर्ते, NG सर, प्रा. बबन झेंडे, प्रविण म्हात्रे इत्यादी उपस्थित होते…