पनवेल समस्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक… १७ ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंदिरात जबरदस्त चर्चासत्र…

0
78

 पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल)

पनवेल महानगरपालिका,विधानसभा मतदारसंघ तसेच उरण विभागातील समस्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक झाली असून याबाबत मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे… त्याबाबत जंगी तयारी सुरु असून प्राथमिक तयारी म्हणून १७ ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंदिरात सकाळी १० वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे… या चर्चासत्राला महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि स्वयंसेवी संस्था यांना निमंत्रित करण्यात आले आहे… अशी माहिती १५ ऑगस्ट रोजी पनवेल शेकाप कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील व शिवसेनेचे बबन पाटील यांनी दिली… या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर,उदयोजक जे.एम. म्हात्रे,पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,काँग्रेसचे आर.सी.घरत ,गणेश कडू,राजेश केणी आदी मान्यवर उपस्थित होते…