अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त झिराड ग्रामपंचायतीतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. झिराड ग्रामपंचायतीतर्फे वर्षातून तीन वेळा वृक्षारोपण केले जाते. तर स्वातंत्र्यदिनानिमित्त एक घर -एक झाड हा अभिनव उपक्रम आतापर्यंत राबविलेला आहे. यात प्रत्येक ग्रामस्थांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे…आजच्या स्वातंत्र्यदिनी वृक्ष वाटप करण्यात आले… ग्रामस्थ ग्रामपंचायतीमधून एक झाड घेऊन जात आहेत. ग्रामपंचायतीने दिलेल्या वृक्षाचे ग्रामस्थांकडून चांगल्या प्रकारे संगोपन केले जाते…
गेली दहा वर्षे दर्शना भोईर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कार्यकार संभाळला आहे. आज प्रशासक म्हणून प्रार्थना पेढवी काम पहात आहेत. तर गेली 13 वर्षे ग्रावविकास अधिकारी म्हणून संजय पाटील यांनी काम करताना गावाला एकत्रित करण्याचे काम केले आहे. त्यामुळे सरपंच, माजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्रशासक प्रार्थना पेढवी यांनी ग्रामपंचायतीचा कारभार लोकाभिमुख करीत निटनेटका केला आहे. सर्व समभाव, सर्वांना योग्यतेची वागणूक मिळत आहे. म्हणून आज झिराड ग्रामपंचायतीचा नावलाैकीक संपूर्ण राज्यात आहे, असे गाैरवोद्गार भाजपाचे नेते, रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती दिलीप भोईर यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित काढले असून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत….