उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील ):-
अटल सेतू झाल्यापासून येथून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे…अटल सेतूचा उपयोग जास्तीत जास्तआत्महत्येसाठी होऊ लागला… असल्याचे बोलल्यास वावगे ठरू नये…अटल सेतूवरून उडी मारणाऱ्या महिलेला वरचेवर पकडले आणि वर खेचले… हा थरारक प्रसंग होता…शुक्रवार दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजुन ६ मिनिटाच्या सुमारास अटल सेतूवरून न्हावाशेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंग १ वर कॉल आला…अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलघर टोल नाक्या कडे जाणाऱ्या लेनवर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच ०२ एफ एक्स १६८६ ही रस्त्यात आहे… कर मधील एक महिला ब्रिजचे रेलिंग क्रॉस करून काहीतरी करीत आहे…त्यावरून गस्त वाहनावर वर असलेले १ पोलीस नाईक ३०१८ ललित शिरसाट २ पोलीस नाईक २३२२किरण मात्रे ३ पोलीस शिपाई ४३४१ यश सोनवणे हे सदर ठिकाणी तातडीने आले…तेथे त्यांना रीमा मुकेश पटेल वय वर्ष ५६ राहणार मुलुंड मुंबई ही महिला दिसली… पोलीस आल्यावर या महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र स्विफ्ट डिझायर कारच्या ड्रायव्हरने तिला वरचेवर पकडले…त्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिला वर खेचले…पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या महिलेला सुरक्षित रित्या बाहेर काढले…