नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कर्जत तालुक्यातील जिते गावचे दुग्ध व्यावसायिक शांताराम जैतू जाधव हे नेहमी प्रमाणे आपल्या म्हशी चरण्यासाठी गेले होते… त्यावेळी तेथे असलेल्या विद्युत पोलखाली जीवंत विदूत तार होती… गवत असल्याने ती तार दिसत नव्हती… नेहमीचा मार्ग असल्याने म्हशी त्याच वाटेने जात होत्या… तारेत विदूत प्रवाह चालू असल्याने दोन म्हशी शॉक लागून दगावल्या…. महावितरणचा कर्जत तालुक्यात भोंगळ कारभार चालू आहे… त्या विरोधात कर्जत येथे साखळी उपोषण सुरु असताना शॉक लागून म्हशी मृत होण्याची घटना घडली… शॉक लागून जनावरे मृत होण्याची कर्जत तालुक्यातील ही तिसरी घटना आहे… याला पूर्णपणे जबाबदार महावितरण आहे… बाजूला शाळा व आदिवासीवाडी आहे… समजा मनुष्य हानी झाली असती तर याला जबाबदार महावितरणच होते… शांताराम जाधव हे गरीब असून त्यांना भापाई मिळावी असे नागरिकांचे मत आहे…तलाठी व पोलीस पंचनामा झाला आहे…