ठाणे शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे) :-
शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी बांधकाम ठेकेदारांच्यावतीने जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले… सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडून केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्या कारणामुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले…या निवेदनात गेल्या दोन वर्षापासून शासकीय निधी अत्यल्प मिळत आहे…आमची देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत… त्यामुळे आम्हास काम करणे खूपच कठीण होत आहे…आमची प्रलंबित देयके लवकरात लवकर देण्यात यावी… अन्यथा आम्ही सर्व काम बंद आंदोलन करणार आहोत.. दि. 21. 08. 2024 पर्यंत आपल्या कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास दि. 22 .08 .2024 पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल… असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे…