रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
शिंदे सरकारने माझी लाडकी बहिण योजना जाहीर केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात त्याची पूर्तता झाल्याचे बँक ऑफ इंडिया मोहोपाडा शाखेत उसळलेल्या गर्दीवरून दिसून आले…लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच दोन महिन्याचे तीन हजार रूपये खात्यात मिळाले… पैसे काढण्यासाठी बहिणींनी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती…
शुक्रवारी मोहोपाडा येथील बॅंक ऑफ इंडिया शाखेत लाडक्या बहिणींची गर्दी पाहून बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना पाचारण करून गर्दीवर नियंत्रण मिळविले…चुकीची घटना घडून ताणतणाव निर्माण होऊ नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या आदेशानुसार पोलीस बँकेत पाठवण्यात आले होते…बँकेच्या ठिकाणी रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस प्रिया कांबळे,नेहा जाधव, प्रिया जंगम झावरे बंदोबस्तासाठी उपस्थित होत्या…