डॉक्टरांची अलिबागमध्ये निदर्शने… रायगडमधील डॉक्टरांचा दिवसभर बंद…

0
108

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

पश्चिम-बंगाल मधील कोलकाता येथे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्ह शनिवार दि. १७ रोजी रायगड मधील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली… आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तोडफोड करून पुरावे नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी, पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी देशभरात स्वतंत्र कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टरांनी आज दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवले…