खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
शेजारील रिसोर्ट मालकाकडून मागील 3-4 वर्षापासून अन्याय होत असताना खालापूर तहसील प्रशासन बघ्याची भुमिका घेत असल्याने व मागील काही वर्षापासून अडीच एकर शेतीचे नाहक नुकसान होत असल्याने संतापलेल्या…हतबल झालेल्या…शेतकरी महिलेने आपल्याच शेतात स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. शेतकरी महिला अलका चव्हाण समेळ जलसमाधी घेण्यास निघाल्या ही होत्या, पण अप्पर तहसिलदार पूनम कदम यांनी 8 दिवसांत प्रातांधिकारी यांच्याकडे बैठक लावून तात्काळ निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने प्रशासनास मुदत देत आपले आंदोलन त्यांनी तात्पुरते मागे घेतले आहे. पण आठ दिवसांत योग्य तो निर्णय झाला नाही… प्रशासनाने पुन्हा फसवणूक केल्यास…कुणालाही न सांगता आपण आपले जीवन संपवून टाकू आणि माझ्या मृत्यूला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, तत्कालीन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड जबाबदार राहतील, असा इशारा अलका चव्हाण समेळ यांनी शेकडो नागरिक, प्रसारमाध्यमे, पोलिस प्रशासन व तहसील अधिकारी यांच्या उपस्थितीत दिला आहे.