महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे ):-
शिवसेनेचे पक्ष प्रतोद आणि महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांनी आज आपल्या महाड येथील निवासस्थानी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी हजारो महिलांनी या रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये आदिवासी महिलांचा जास्त समावेश होता.आमदार भरत गोगावले यांना राखी बांधण्यासाठी अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम महिलांचा देखील मोठा प्रमाणात समावेश होता. यावेळी आमदार गोगावले यांचे संपूर्ण हात राख्यांनी भरलेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून काल महिलांना सरकार कडून गिफ्ट मिळताच आज भरत गोगावले यांनी सुद्धा महिलांना रक्षाबंधनाच विशेष गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत केलं.यावेळी हजारों महिलांनी आमदार गोगावले यांच्या निवासस्थानी त्यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती.