महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):
रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी महाबळेश्वर येथील 3 पर्यटकांचा सावित्री खाडीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सदरचे पर्यटक हे महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे झरे व शाही शालानी दर्गा पाहण्यासाठी आले होते. महाबळेश्वर येथील एकाच कुटुंबातील सहा जण व त्यांचा एक मित्र पर्यटन स्थळी आले होते. यापैकी तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला असून रेस्क्यू टीम यांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत… मनावर शाबुद्दीन नालबंद वय वर्ष 38, दिलावर शाबुद्दीन नालबंद वय वर्ष 28, जाहीद जाकीर पटेल वय वर्ष 28 राहणार महाबळेश्वर अशी तिघांची नावे असून यापैकी दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये एक महिला व तीन लहान मुले बचावली आहेत… घटनास्थळी पोलीस प्रशासन व महाशक्ती ॲम्बुलन्स दाखल झाली असून पोलीस पंचनामा प्रक्रिया सुरू होती…