रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत ):-
नागोठणे कोळी वाड्यासह रायगड आणि कोकणात नारळी पौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला…पारंपारिकपणे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे शुभ मानले जाते. तसेच मासेमारी आणि जल-व्यापाराची सुरुवात करण्याआधी कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करतात.नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे, कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे. या दिवशी कोळी बांधव आपले आयुष्य चालवण्याचे साधन मानल्या जाणाऱ्या समुद्राची पूजा करतात…नाव नौका होड्या देखील त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने या दिवशी त्यांची पूजा करून मासेमारीला सुरूवात करतात…रायगड जिल्हयातील श्रीवर्धनमध्ये सुध्दा हा नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात सुरू असल्याचे पाहायला मिळतेय…