Sunday, November 24, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडसण आयलाय गो...आयलाय गो...नारळी पुनवेचा... मनी आनंद मावना...कोळ्यांच्या दुनियेचा...रायगड जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्सवात साजरी

सण आयलाय गो…आयलाय गो…नारळी पुनवेचा… मनी आनंद मावना…कोळ्यांच्या दुनियेचा…रायगड जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्सवात साजरी

 रायगड शिवसत्ता टाइम्स (आनंद जोशी ,संदेश पेडणेकर ,दत्ता मोकल):-

सण आयलाय गो …आयलाय गो… नारळी पुनवेचा… मनी आनंद मावना… कोळ्यांच्या दुनियेचा… अशा विविध पारंपरिक कोळी गीतांवर नृत्य करीत रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवानी समुद्राला नारळ अर्पण केला….  नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा अतिशय महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी विधीवत पुजा करून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते. हा सण सोमवारी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनसह अनेक भागात उत्साहात पार पडला. पारंपारिक वेशभूषा करून मिरवणूक काढून समुद्रकिनारी पुजा करून समुद्राला शांत होण्याबरोबरच समुद्रात मासळी भरपूर मिळावी असे आवाहन करण्यात आले…सकाळपासून कोळीवाड्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी नारळ फोडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. समुद्राला नैवेद्य देण्यासाठी महिलांनी नवनवीन पदार्थ तयार केले. सायंकाळी चारनंतर श्रीवर्धन कोळीवाड्यासह आक्षी, नागाव, रेवस, मांडवा, मुरूड, अलिबाग,पनवेल अशा अनेक कोळीवाड्यामधून मिरवणूक काढण्यात आली. कोळी गीतांच्या तालावर नाचत ही मिरवणूक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीसोबत डोक्यावर कळश, पारंपारिक वेशभुषा करीत कोळी समाज सहभागी झाले होते. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक असे सर्वच मंडळी या मिरवणूकीमध्ये सहभागी झाले. समुद्राकिनारी मिरवणूक आल्यावर सर्वांनी समुद्राची विधीवत पुजा केली. कळशातील पाणी व सोन्याचा मुलामा असलेले नारळ समुद्राला अर्पण केले. त्यानंतर सुखरूप ठेवण्याचे साकडे समुद्राला घालण्यात आले…नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजासाठी खुप महत्वाचा आहे. संध्याकाळी मिरवणूक काढली जाते. पारंपारिक वेशभूषा करून नाचत ही मिरवणूक समुद्रकिनारी आणली जाते. त्यानंतर समाजातील सर्व मंडळी एकत्र येऊन पुजा करतात. समुद्राला शांत राहण्याचे, सुखरुप ठेवण्याचे आवाहन केले जाते. ही परंपरा आजही नारळी पौर्णिमेला जपली जाते. त्यानंतर मासेमारीला सुरुवात केली जाते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments