पोलिसांच्या बेफिकिरीमुळे बदलापूर पेटले… २ बालिकांवर अत्याचार होऊनही पोलीस ढिम्म…

0
73

शिवसत्ता टाइम्स बदलापूर वार्ताहर :- 

अवघ्या साडेतीन वर्षांच्या दोन बालिका शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील सफाई  कर्मचाऱ्याकडून या दोघींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला…ही धक्कादायक घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली… मात्र पोलीस यंत्रणा  ढिम्म राहिली… पोलिसांच्या बेफिकिरीमुळे आता बदलापूर चांगलेच  पेटले आहे… नागरिकांनी शाळेच्या आवारात एकत्र येत ठिय्या आंदोलन केले…त्यानंतर ट्रॅकवर उतरून रेल रोको केला…यावेळी महिला पोलीस अधिकारी शुभदा शितोळे यांच्या विरोधात लोकांनी जोरदार संताप व्यक्त केला.. प्रकरण वाढण्यास सदर महिला अधिकारी जबाबदार आहे…या महिला अधिकारी यांनी पॉस्को प्रकरण असूनही गुन्हा  दाखल करण्याच्या प्रक्रियेला उशीर लावला…असा आरोप पालकांकडून होत आहे… दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली होती …तरीही गुन्हा नोंदवण्यासाठी 12 तास या मुलींच्या कुटुंबीयांना वाट पाहावी लागली…त्यामुळेच बदलापूरकरांनी जोरदार आंदोलन केले …