शिवसत्ता टाइम्स दत्ता मोकल (पनवेल) :-
लाडकी बहीण फक्त पोस्टर्सवर सुरक्षित ठेवणारे केंद्र सरकार प्रत्यक्षात बहिणींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास विलंब केल्यामुळे हा जनआक्रोश उफाळून आला. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात धाव घेऊन रेल रोको केला. या आंदोलनकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा योग्य नव्हता. हे आंदोलन फक्त आता बदलापूर पुरते मर्यादित राहिलेले नसून संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या माध्यमातून छेडण्यात येत आहे…बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले…हे जनआंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत ,माजी आमदार व महाविकास आघाडीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले… ज्या सफाई कर्मचाऱ्याने हे दुष्कृत्य केले त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला… शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलशी बोलताना शिरीषदादानी सांगितले की,स्त्री-अत्याचाराच्या किंकाळ्या काही थांबायला तयार नाहीत….या घडलेल्या घटना म्हणजे राज्याच्या गृहखात्याची लखतरे आहेत…शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्यात लाडक्या बहिणींच्या लाडक्या लेकी देखील सुरक्षित नाहीत…
या आंदोलनाला रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीषदादा घरत,माजी आमदार बाळाराम पाटील,पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत,काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील ,शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख रामदास पाटील ,काँग्रेसचे पनवेल तालुका जिल्हा अध्यक्षा श्रुती म्हात्रे ,शिवसेना नेत्या लीना गरड, अध्यक्ष पनवेल हेमराज म्हात्रे, नगरसेवक आणि पनवेल तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…