ऑनलाईन आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश…अलिबागच्या रिसॉर्टवर सापडले ५० हून अधिक तरुण

0
106

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

दिवसेंदिवस ऑनलाईन गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे…अनेक सर्वसामान्य लोकांसोबत फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे…अनेक ऑनलाईन गुन्हेगारीचे गुन्हे हे पोलीस स्थानकात दाखल केले जात आहेत…दर दोन दिवसांमध्ये फसवणुक, जुगार अड्डे, खोट्या शेअर मार्केटची फसवणूक असे अनेक गुन्हे हे दाखल केले जात आहेत. तरुण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींची फसवणूक करून त्याच्याकडून पैसे उकळणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दररोज समोर येत आहेत…असाच एक धक्कादायक प्रकार अलिबागमधून समोर आला आहे.            अलिबाग तालुक्यामधील परहूर येथील नेचर्स एज अलिबाग रिसॉर्टमधून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचे काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातू केले जात होते. अलिबाग पोलिसांनी ऑनलाईन जुगार अड्डयाच्या संशयातून घातलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली. यात पन्नासहून अधिक तरुण सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे… याबाबत पोलिसांची कारवाई सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे…