कर्जत शिवसत्ता टाइम्स (नरेश जाधव):-
गुंडगे येथील सोमजाई इंटरप्राईजेस साईटवरील कामगारांना दैनंदिन वापरासाठी व पिण्याचे पाणी घेऊन येणार्या टॅंकरखाली सापडून एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यु झाल्याची घटना दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी घडली…याबाबत सविस्तर वृत्त असे की,राहुल मदन कांबळे यांच्या सोमजाई इंटरप्राईजेस या बांधकाम करणार्या साईटवर कामगारांना दैनंदिन वापरासाठी व पिण्याचे पाणी घेऊन येणारा टॅंकर आला होता…त्यामुळे टॅंकर मधुन पाणी घेऊन सर्व कामगार आपल्या लेबर कॅम्पमध्ये जात होते. त्याचवेळी रामप्यारी मडु सिंह पसाय, वय वर्षे ६०, मुळ रा. सोडपुर, कोठीसोडपुर, पीधपुर राज्य मध्यप्रदेश सध्या राहणार गुंडगे ता कर्जत जि रायगड या वयोवृद्ध महिला देखील टॅंकरमधून पाणी घेऊन जात असताना टॅंकर चालक शाबुददीन मेहबुब शेख वय वर्षे २९, रा. दहिवली बामचा
मळा ता. कर्जत याने बेदरकारपणे आपल्या ताब्यातील टॅंकर क्रमांक एमएच ०६ एजी ३२६५ हा जोराने पाठीमागे रिव्हर्स घेतल्यामुळे रामप्यारी मडु सिंह पसाय यांच्या छातीला, डोक्याला व नाका तोंडाला मार लागुन गंभीर दुखापत होऊन त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना त्यांचा मुलगा जितेन्द्र मडु सिंह पसाया वय वर्षे ४०, यांनी व त्यांच्या सहकार्यांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे दाखल केले असता तेथील डाॅक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले.
सदर घटनेबाबत कर्जत पोलिस ठाण्यात टॅंकर चालक शाबुददीन मेहबुब शेख याच्यावर भारतीय दंड विधान कलम १०६ (१), २८१, १२५ (ए), १२५ (बी), मोका कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला…सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उप विभागीय अधिकारी डी.डी.टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांसह पोलिस उपनिरीक्षक बाबू शंकरराव धबडे, पोलिस हवालदार अनिल वडते, साहाय्यक फौजदार संजय जगताप, पोलिस शिपाई गणेश पाटील हे करीत आहेत…