पुणे शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
सध्या राज्यामध्ये बदलापूर प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर शाळेमध्ये अत्याचार करण्यात आल्यामुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर शिपाई नराधमानेने केलेल्या या कृत्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे…या घटनेवर आधारित पुण्यामध्ये पोस्टर लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मामा म्हणून हाक मारत चिमुकल्या मुलींनी सुरक्षेची मागणी केली आहे.पुण्यात एका चौकात हे पोस्टर्स लागले आहेत. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक आघाडीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी हे पोस्टर लावले आहे. गुरनानी यांचे नाव या पोस्टरवर आहे. या ब्लॅक ॲन्ड व्हाईट पोस्टरवर एक चिमुकली मुलगी दाखवली आहे. त्यावर मनाला भिडणारा असा घेणारा मजकूर लिहिला आहे. चिमुकल्या कळ्या उमलण्याआधीच कोमेजल्या. असे या पोस्टरवर लिहिले आहे. या पोस्टरमधील मुलगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मामा म्हणत आहे. तसेच सुरक्षेची मागणी करत आहे. आईला 1500 रुपये तुम्ही दिले. पण माझ्या सुरक्षेचे काय? मुख्यमंत्री मामा, महाराष्ट्राला लाडकी बहीण नाही, सुरक्षित बहीण योजना पाहिजे, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. पुण्यातील हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून याची चर्चा सुरु आहे.