नवी मुंबईच्या उरणमध्ये हिट अँड रन प्रकरण… भरधाव कारची ५ बाईक व नागरिकांना भीषण धडक…

0
92

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

नवी मुंबईतील उरणमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे…द्रोणागिरी नोडमधील देवकृपा चौकात २४ ऑगस्ट रोजी  रात्री ८ ते ८.३०  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे… भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ५ दुचाकींना व नागरिकांना जोरदार धडक दिली आहे…अपघातानंतर ३ जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे…कार चालक भीषण धडक देऊन फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे… या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहे…फरारी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत… मात्र अशा अनेक घटना या परिसरात दिवसेंदिवस घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे… कारण कोणता चालक किती वेगात येईल आणि जोरात धडक देऊन जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे…पोलीस या आरोपीला कधी शोधणार याकडे संपूर्ण उरणकरांचे लक्ष लागून आहे…