स्त्री लंपटगिरीची प्रकरणे वाढू लागली… खालापुरात महिलांचा पाठलाग करणाऱ्यावर गुन्हा…

0
110

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

बदलापूर येथील चिमुरड्या मुलींवरील अत्याचारांच्या घटना ताज्या असतानाच चौक – वाशीवली रस्त्यावर तुपगाव हद्दीत जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेची छेड काढून तरुण फरारी झाला होता… मात्र पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले आहे…सदर तरुण एका राजकीय संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. … शुक्रवारी सकाळी आपल्या लहान मुलांना शाळेतून आणण्यासाठी तुपगाव येथील दोन महिला येत असताना एका अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला वाढलेल्या मोठ्या गवतातून बाहेर येऊन एका महिलेचा हात धरला,तर दुसऱ्या महिलेकडे मोबाईलची मागणी केली,अचानक घडलेल्या घटनेने दोघी महिला घाबरल्या, त्यांनी आरडा ओरड सुरू केली असता, हा अज्ञात व्यक्ती पळून गेला.. दोन्ही घाबरलेल्या महिलांनी आपल्या घरच्या लोकांबरोबर चौक दुर क्षेत्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली…चौक पोलिसांनी घडलेल्या ठिकाणी जाऊन तपास करण्यास सुरुवात केली…तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संशयीत माणूस रसायनी रीस येथील भटवाडी येथे राहतो…अशी माहिती पोलिसांना मिळाली…दुसऱ्या दिवशीही तो इसम सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी आला होता…शाळेत जाणाऱ्या लहान मुलाकडे तो पत्ता विचारत होता…तेथून एक महिला चालली होती… तो तिच्या मागोमाग निघाला… महिलेने आपला कोणीतरी पाठलाग करतोय या संशयाने लहान मुलांना घेऊन साई मंदिरात आसरा घेतला…ही बाब पोलिसांना कळवल्यावर पोलीस तो ज्या ठिकाणी राहतो… त्या रिस भटवाडी येथे गेले…तेथे त्याच्या घरातील माणसे राहतात अशी माहिती पोलिसांना मिळाली…त्यानंतर पोलिसांनी त्याला दुपारी २ वाजता ताब्यात घेतले…पोलीस ठाण्यात आणल्यावर ४ महिलांनी त्याला ओळखले… चौकचे सहायक पोलीस निरीक्षक मनीष मोरे यांनी ही कारवाई चौक पोलिसांच्या मदतीने केली…. सदर इसम हिरा नंदानी येथे राहतो… त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते…