Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगड आगामी दहिहंडी व गणेशोत्सव सर्व मंडळांनी शांततेत व शासनाच्या आखून दिलेल्या नियमाप्रमाणे...

 आगामी दहिहंडी व गणेशोत्सव सर्व मंडळांनी शांततेत व शासनाच्या आखून दिलेल्या नियमाप्रमाणे साजरा करावा:सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत

 पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :- 
 
 
       आगामी दहिहंडी व गणेशोत्सव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळांनी शांततेत व शासनाच्या आखून दिलेल्या नियमाप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले…यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील, पो.नि.जगदीश शेलकर, व गोपनीय विभागाचे कुँवर आदी उपस्थित होते. 
             यावेळी मार्गदर्शन करताना सहा.पो.आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले की,  सर्व मंडळी धर्मादाय आयुक्त यांच्या कडे गणेश उत्सव मंडळाची व दहीहंडी उत्सव मंडळांची नोंदणी करावी. सर्वांनी ऑनलाईन अर्ज भरणे, जागामालक किंवा  ग्रामपंचायत यांच्याकडे मंडपासाठी परवानगी घेणे, तात्पुरता  विद्युत कनेक्शन घेणे ,स्टेज / मंडप मजबूत असावे  याबाबत तज्ञ अथवा अभियंता यांच्याकडून तपासणी करून घ्यावी., ध्वनी प्रदूषण संदर्भात  माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे , मिरवणुकीत  रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे , सर्व संबंधित विभागाच्या परवानगी घेणे बंधनकारक आहे , मंडळाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमणे , नवी मुंबई पोलीस व्हाट्सप सर्वांनी फॉलो करावे. तसेच सायबर क्राईम जनजागृतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले आहे…
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments