Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडपनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शाळा व कॉलेज परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन... 

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून शाळा व कॉलेज परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन… 

पनवेल शिवसत्ता टाइम्स (संजय कदम) :- 
        बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने, सुरक्षा  बैठक म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध शाळा व कॉलेज यांना अधिकारी वर्गाने भेटी देवून तेथील विद्यार्थी, शिक्षक वर्ग व पालकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार, गोपनीय विभागाचे कॅुंवर व इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी तालुक्यातील नेरे भाग नेरे हायस्कूल, नेरेगाव., स्वामी विवेकानंद जनता    माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आजीवली गाव, एमटीएस इंटरनॅशनल स्कूल, कासारभट ता. पनवेल  येथे भेट देवून विद्यार्थी वर्ग व शिक्षक यांचेकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमामधील उपस्थित विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या अनुषंगाने, गुड टच- बॅट टच, नवीन कायदा जनजागृतीपर, सायबर क्राईम सुरक्षा व्हाट्सअप ग्रुप अवेरनेस, व महिलां/ मुली सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना केलेले आहेत.  तसेच वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त परिपत्रकाची माहिती देऊन त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करणे बाबत सूचना दिल्या आहेत. सदर मार्गदर्शनपर कार्यक्रमाकरिता वरील 3 शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व एकूण 400 ते 500  विद्यार्थी उपस्थित होते… 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments