Friday, November 22, 2024
Homeधार्मिकखारघरमधील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा महोत्सव... जन्माष्टमीनिमित्त भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी...

खारघरमधील इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा महोत्सव… जन्माष्टमीनिमित्त भाविकांची दर्शनाला मोठी गर्दी…

खारघर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघरमधील गोल्फ कोर्स समोरील इस्कॉन इंटरनॅशनल या  मंदिर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने  साजरा करण्यात आला …एकूण नऊ दिवस चालणाऱ्या या जन्माष्टमी उत्सवाचा आज नवव्या दिवशी कृष्णाच्या जन्माने पूर्ण झाला…यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री  श्री कृष्णाचा महाअभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. यावेळी श्री कृष्णाचे भक्त मोठ्या संख्येने या मंदिरात जमले होते.ते सर्व भक्तिभावाने कृष्णाची गाणी गात, नाचत मोठ्या भक्तिभावाने  श्री कृष्णाचा महाअभिषेक व पूजा आनंद घेत होते.श्री कृष्णाच्या दासांनी इस्कॉन मंदिरात श्री कृष्णाची विविध प्रकारची गाणी गायली,भजने गात श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले होते.यावेळी श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मुर्त्यांना पाणी, दूध, दही, नारळाचे पाणी, चंदन, मध इत्यादी अनेक शुद्ध रूपाने अभिषेक करण्यात आला.नव नवीन कपडे नेसविण्यात आली.  यावेळी श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मुर्त्यांना नवीन आभूषणे घालण्यात आली.वेगवेगळ्या फुलांनी व फुलांच्या कळ्यांनी श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मुर्त्यांना अभिषेक करण्यात आला.श्री कृष्ण व राधा यांच्या चांदीच्या मुर्त्यां ज्या मंदिरात ठेवल्या होत्या त्या मंदिराला संपूर्ण फुलांची सुंदर आरास केली होती.सर्वांनी मनोभावे पूजा करून नंतर प्रसाद घेत श्री कृष्णाची जन्माष्टमी साजरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments