Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रदेव अक्कल वाटत होता तेव्हा भाजपवाले कुठे होते?... सत्ता भाजपची...आंदोलन ठाकरे-दानवेंसमोर...जोरदार फिरकी...

देव अक्कल वाटत होता तेव्हा भाजपवाले कुठे होते?… सत्ता भाजपची…आंदोलन ठाकरे-दानवेंसमोर…जोरदार फिरकी…

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत… तेथे ते थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आंदोलनाचा प्रयत्न केला… यावेळी काही भाजपा कार्यकर्त्यांनी मीडियाशी बोलताना घोषणाबाजीचे जे कारण सांगितले… त्यावरून हसावे की रडावे हेच कळत नसल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला आहे… भाजपच्या या लुटुपुटुच्या कथित आंदोलनाची सोशल मीडियावर जोरदार फिरकी घेण्यात येत आहे… देव अक्कल वाटत होता तेव्हा भाजपवाले कुठे होते?… सत्ता भाजपची असताना दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसमोर आंदोलन कशासाठी? भाजपच्या गृहमंत्र्यांनी दिशा सालियन प्रकरणी चौकशी करून आरोपींना अटक केली पाहिजे… भाजपची सत्ता येऊन आता जवळजवळ दोन वर्षाहून अधिक कालावधी झाला आहे… तरीही आरोपी सापडत नाहीत काय? असा सवाल शिवसैनिकांचा आहे… दिशा सालियन प्रकरणी भाजपवाल्यांनी आपल्या गृहमंत्र्याला म्हणजेच देवाभाऊंना जाब विचारावा… असा सल्ला शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे…

छत्रपती संभाजीनगर शहरातील रामा हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते… परिस्थितीचे गांभीर्य बघता पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments