Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रडीपीआयए अंतर्गत दिघी पोर्टला मंत्रिमंडळाची मंजुरी.... ६०५६ एकर जागेत राबविली जाणार योजना...

डीपीआयए अंतर्गत दिघी पोर्टला मंत्रिमंडळाची मंजुरी…. ६०५६ एकर जागेत राबविली जाणार योजना…

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-  

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांमध्ये १२ नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली…यात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचाही समावेश करण्यात आला…दिघी पोर्ट विकासासाठी केंद्र सरकारने ५४६९ रु. कोटी मंजूर केले…महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडोर विकास प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील दिघी बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे… त्यानुसार दिघी पोर्ट इंटस्ट्रीयल एरीया (डीपीआयए) एकूण ६०५६ एकर इतक्या क्षेत्रात विकसीत केले जाणार आहे…या विकास कामासाठी केंद्राने ५४६९ रु कोटी उपलब्ध केले असून या प्रकल्पाची गुंतवणुक क्षमता ३८ हजार कोटींची राहणार असून या क्षेत्राच्या माध्यमातून १ लाख १४ हजार १८३ जणांना रोजगार मिळणार असल्याचे माणगाव येथील एमआयडीसी मधील पोस्को कंपनीत घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये माहिती देण्यात आली…
या पत्रकार परिषदेसाठी अमरदीप सिंग (IAS) सचिव,उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग  रजत कुमा सैनी (IAS)सीईओ आणि एमडी नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनआयसीडीसी) पीडी मलिकनेर (आयएएस) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (MITL) अनिल भंडारी (IAS) सह मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments