Wednesday, September 18, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडमुंबई- गोवा मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण...संथ गतीने चालू असलेल्या कामाबाबत मनसैनिक...

मुंबई- गोवा मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण…संथ गतीने चालू असलेल्या कामाबाबत मनसैनिक आक्रमक… 

 पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध मुद्द्यांवरून मोर्चा काढताना दिसतच असते…अनेक घटना ताज्या असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलच्या आंदोलनाने चर्चेत आली आहे…मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षापासून संथ गतीने सुरु आहे…महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून कोकणातील चाकरमानी तसेच प्रवाशी वर्गाचे अपघातात जीव घेत आहे.महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आवाज उठवत आहेत…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ही महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी उपजिल्हा अध्यक्ष संदिप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले…महामार्ग विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे लक्ष वेधण्यात आले… तसेच यावेळी जनआंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला…
मुंबई-गोवा महामार्गाजवळील वडखळ ते पेण रेल्वे स्टेशन येथील सर्व्हिस रोडचे काम करताना ठेकेदार संथ गतीने करत आहे…. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे…प्रवास करताना पाच किलो मीटरचा वळसा मारावा लागत आहे…यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे…गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी सर्व्हिस रोडचे काम महामार्ग विभाग व ठेकेदार यांनी पूर्ण करावे,या सात दिवसांच्या आत जर काम पूर्ण झाले नाही तर जन आंदोलन छेडू असा इशारा मनसेच्या संदिपदादा ठाकूर यांनी निषेध आंदोलन करताना दिला आहे…
यावेळी त्यांच्यासमवेत पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील,पेण तालुका अध्यक्षा गौरी पाटील,पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील,पेण शहर उपाध्यक्ष अमेय पाटील,पेण तालुका उपाध्यक्ष विजय पाटील,पेण शहर उपाध्यक्ष पंकज पाटील ,जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंड,बोरगाव शाखा अध्यक्ष दर्शन अंगद,दुष्मी शाखा ,अध्यक्ष प्रसाद ठाकूर,तसेच मनसे महिला पदाधिकारी, कार्यकर्ते,उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments