खोपोली शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम ,खलील सुर्वे):-
बेलापूर सीबीडी-खोपोली या नवी मुंबई महानगर पालिका परिवहन विभागाच्या गाडीने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कलोते हद्दीत असलेल्या बापदेव मंदिराच्या पुढे मोकाट जनावरांना ठोकर मारण्याचे महापातक केले आहे…चालकाला मौन गायत्री म्हणजेच गाई-गुरे दिसली नाहीत काय? तो कोणत्या तंद्रीत होता? असा सवाल लोकांचा आहे… मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बेलापूर सीबीडी-खोपोली या नवी मुंबई महानगर पालिका परिवहन विभागाच्या एम्एच ४३/पी पी/८१५८ या गाडीने बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कलोते हद्दीत असलेल्या बापदेव मंदिराच्या पुढे मोकाट जनावरांना ठोकर मारली…काही जनावरे रस्ता ओलांडत होती… तर काही जनावरे रस्त्यावर बसुन होती… अपघातानंतर जनावरे सैरभैर झाली…एक बैल गंभीर जखमी झाला असून गाईचा पाय मोडलाआहे…जखमी जनावरांना जेसीबीच्या मदतीने दवाखान्यात नेण्यात आले… हनीफ कर्जिकर व गोरक्षक किशोर ओसवाल यांनी मदतकार्य केले… अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर हेही घटनास्थळी दाखल झाले…ग्रामविकास अधिकारी निलेश म्हसकर,वाहतूक पोलीस,अपघाताग्रस्त टीम यांनी मदत कार्य केले…मुख्य रस्त्याच्या बाजूला पूर्ण गावाचा कचरा टाकण्यात येतो… या कचऱ्याच्या मागे बैल अडकला होता…त्यामुळे भयंकर दुर्गंधीतही संबंधितांनी मदत कार्य केले…
एनएमएमटीच्या चालकांनी अपघात करायचे मात्र यावर लोकांनी आवाज उठविल्यानंतर तेथील बस सेवा बंद करायची…उरणमध्ये असा प्रकार घडला होता…तेथे एनएमएमटीने अपघात करून तरुणाचा बळी घेतला… लोकांच्या वाहनांचे नुकसान केले…लोकांनी नुकसान भरपाईची मागणी केल्यानंतर उरण शहरासह ग्रामीण भागातील बस सेवा बंद केल्या… याआधी उरणमधून तिकीट विक्रीच्या माध्यमातून करोडोंचा महसूल गोळा केला होता… उरणकरांना वाऱ्यावर सोडले…पण उरणकर एनएमएमटी समोर झुकले नाहीत…गाड्या बंद तर बंद… एनएमएमटी गेली उडत… अशी भूमिका उरणकरांनी घेतली…ही भूमिका आजतागायत कायम आहे…एनएमएमटी प्रशासनाला पैशाची गरज असल्याने ते आपली हद्द सोडून इतर हद्दीत गाड्या चालवत आहेत…त्यामुळे एनएमएमटीने प्रवाशांशी सौजन्याचे धोरण अवलंबणे गरजेचे आहे…एनएमएमटी पास सुविधा आपल्याच नवी मुंबई हद्दीतील लोकांना सवलतीने देते…हद्दी बाहेरील लोकांना सवलतीचे पास दिले जात नाहीत…हद्दीबाहेरील लोकांकडून फक्त पैसा ओरपला जातो…या सर्व बाबींचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे आताही एनएमएमटीच्या गाडीने मोठा अपघात केला आहे… मात्र या अपघातात सापडली आहेत…मुकी जनावरे… त्यामुळे या अपघाताविरोधात आवाज उठवायचा की नाही ? नाहीतर उद्या आवाज उठविला म्हणून उन्मत्त एनएमएमटी प्रशासनकाढून खोपोली बस सेवा बंद व्हायची…हे लोकांच्या मनातील प्रश्न आहेत…