इंदापूर शिवसत्ता टाइम्स (गौतम जाधव):-
इंदापूर शहरातील श्री स्वयंभू महादेव मंदिरात गेले नऊ ते दहा वर्षापासून शेवटच्या श्रावणी सोमवार या दिवशी जय हनुमान ग्रामविकास मंडळ इंदापूर यांच्यामार्फत शिवभंडारा केला जातो… यावेळी महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगण,भाविक घेतात… त्यानुसार यावर्षीदेखील दि. २ सप्टेंबर रोजी शिवभंडारा करण्यात आला…यावेळी मंत्री आदितीताई तटकरे यांची उपस्थिती होती …
जय हनुमान ग्रामविकास मंडळ,ॐ साई मिञ मंडळ मुंबई,नवतरूण मिञ मंडळ,तसेच महिला मंडळ इंदापुर हे शिवभंडारा व महाप्रसादाचे आयोजन करतात… दरवर्षी दिड हजाराहून अधिक लोक शिवभंडाऱ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतात…असे जय हनुमान ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष तसेच तळाशेत ग्रूप ग्रामपंचायत माजी उपसरपंच उदय अधिकारी यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले…
शेवटचा सोमवार हा उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ लागत असतात…तांदळाची भाकरी,भात,डाळ,बिरडा भाजी,चना भाजी,तेरीची भाजी,भेंडीची भाजी,आळू वडी,पापड,लोणचे,खिर,मिरची… यांचा समावेश होता… असे हे उपवासाचे सात्विक जेवण हिरव्यागार केळीच्या पानावर दिले गेले…महाप्रसादाला प्रत्येक घरातून दहा, विस,पंचवीस,तीस,पन्नास अशा तांदळाच्या भाकऱ्या दिल्या जातात…. कुठल्याही प्रकारे गडबड गोंधळ न होता शांततेत हा उत्सव पार पडतो…या कार्यक्रमला दिपकशेठ जाधव,शेखरशेठ देशमुख,काका नवगणे,समिर मेहता, नितिन घोणे,बाळा खातु,शुक्रदास मोरे यांची उपस्थिती होती…