पेण शिवसत्ता टाइम्स (प्रदिप मोकल):-
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई-ठाण्याचा नोकरदार कोकणात जाण्यास सुरुवात झाली आहे… गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज आहे… खारपाडा ते कशेडी घाट दरम्यान 7 विभागात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. खारपाडा ते पोलादपुर कशेडी घाटापर्यंतच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून 7 उपविभागिय पोलिस अधिकारी, 11 पोलिस निरिक्षक,42 सहाय्यक पोलिस निरिक्षक , 82 वाहतुक अमलदार, 211पोलिस ठाणेकडील अमलदार, 27 वाॅकीटाॅकी,10 वायरलेस सेट,10 टोईग क्रेन,10 रुग्णवाहिका,29 सी.सी.टीव्ही कॅमेरे… असा तगडा पोलिस बंदोबस्त असणार आहे…
मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी केलेल्या उपाय योजनांची व नेमणूक केलेल्या पोलिस अधिका-यांची, कर्मचा-यांची आढावा बैठक पेण तालुक्यातील गडब येथील काळंबादेवी मंदिराच्या सभागृहात झाली… या बैठकीला रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागिय पोलिस अधिकारी नितीन चौधरी, शिवाजी फडतरे, श्री.दौडकर, जिल्हा वाहतूक पोलिस निरिक्षक एस. व्ही लांडे,वडखळ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे, पेण पोलिस निरिक्षक संदिप बागुल, दादर सागरी पोलिस निरिक्षक नागेश कदम आदींसह पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई -गोवा महामार्गावरुन गणेशभक्ताना घेवून अनेक बसेस व छोटी-मोठी वाहने जाणार आहेत… या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी… त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा न येण्यासाठी पोलिस कर्मचा-यांनी व अधिका-यांनी सर्तक रहावे… शासनामार्फत गणेशभक्तां च्या सोयीसाठी सुविधा केंद्र, वैद्यकीय मदत केंद्र महामार्गावर उभारली आहेत… त्याची माहीती प्रवाशांना द्या… कोकणवासीय घराकडे येणार आहेत. त्यांच्या प्रवासात आडथळा नको यासाठी सर्तक रहा… सहनशिलतेने जबाबदारीने काम पार पाडा… गणेशभक्तांना मदत करा असे रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन करताना सांगितले…