अटल सेतू ठरत आहे आत्महत्येचे केंद्र… चेंबूरच्या तरुणाची अटल सेतूवरून समुद्रात उडी…

0
153

उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

मुंबईतील उद्योगपतींना तात्काळ उरणला पोहचता यावे यासाठी उभारण्यात आलेल्या शिवडी ते नाव्हाशेवा पुलाचे अटल सेतू असे नामकरण आहे…सध्या हा अटल सेतू ठरत आहे आत्महत्येचा केंद्र ठरत चालला असल्याची जोरदार चर्चा आहे… मानसिक तणावाखाली असलेले लोक जीव देण्यासाठी याच पुलाचा वापर करत आहेत.. गेल्या महिन्यात एक महिला या पुलावरून उडी टाकत होती…मात्र तिला कॅब चालक आणि पोलिसांनी वाचविले होते… त्यानंतर आता नव्याने अटल सेतूवरून आत्महत्या करण्यात आली आहे…सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास चेंबूर येथे राहणाऱ्या ॲलेक्स रेगी या तरुणाने अटल सेतूवरून उडी मारून जीव दिला…पोलीस पोहचेपर्यंत उशीर झाला…तोपर्यंत ॲलेक्सने उडी मारली…त्याने आपली कार नंबर Mh -14-GH-2499 ही अटल सेतूवर थांबवून समुद्रात उडी मारली…दरम्यान त्याचा मृतदेह सापडला असून तो त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वृत्त आहे…