कोकण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
कोकणातील सर्वांचा आवडता सण म्हणजे गौरी-गणपती…याच सणाचे शहरातगणेशोत्सवात रूपांतर होते…मात्र कोकणात हा सण गौरी-गणपतीचा सण म्हणूनच ओळखला जातो…गौरी-गणपती हा सण या देशातील महान मातृसत्ताक संस्कृतीकडे घेऊन जातो…कोकणकरांनी ही संस्कृती जीवापाड जपली आहे…कितीही संकटे येऊ देत…अडचणी येऊ देत… त्यावर मात करीत कोकणकर गौरी-गणपतीच्या सणाला कोकणात धाव घेतात…असा हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे…सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे…कोकणातील बाजारपेठा फुलांच्या माळांनी ,विद्युत रोषणाईने सजल्या आहेत…एरव्ही शांत असलेली गावे आता गजबजून जात आहेत…कोकणातील बंद घरांची कुलपे उघडली आहेत…चाकरमानी घरांच्या साफसफाईत आणि गणपतीच्या सजावटीत रमले असल्याचे चित्र आहे…कोकणातील बहुसंख्य लोक नोकरी धंद्यासाठी पुणे, मुंबईसह इतर शहरात स्थलांतरीत झाले आहेत…हे सर्व कोकणकर कुटुंबीय गणेशोत्सवाला कोकणात आवर्जून येतात…लहान मुलांना यानिमित्ताने आपले गाव बघायला मिळते…गावाची ओढ निर्माण होते…बाल्या,बाल्याची आई,बाली आणि शहरातील 10 बाय 10 ची खोली…असे पूर्वी चाकरमान्यांबाबत बोलले जायचे…मात्र आता शिक्षण आणि संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे चाकरमान्यांची मुले शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर,शासकीय अधिकारी-कर्मचारी, उदयोजक, परदेशी स्थायिक, शिक्षक, व्यावसायिक, व्यवस्थापक झाली आहेत…त्यामुळे 10 बाय 10 च्या खोलीत राहणारा चाकरमानी आता ब्लॉक, फ्लॅट, बंगला, विला, रोहाऊसमध्ये राहत आहे…काही चाकरमान्याकडे स्वतःची चारचाकी असल्याने त्या वाहनानेच गाव गाठत आहेत… काहीजण ग्रुपने गाड्या करून गावी येत आहेत…
कोकणातली काही घरे तर गणेशोत्सवानिमित्त उघडली जातात…गणेशोत्सवात खरा आनंद तर गावात राहणाऱ्या वयोवृध्दांना असतो…गणपतीच्या आगमनाचा आनंद असतोच…पण वर्षभर आपल्यापासून लांब असलेली आपली नातवंडे, मुले गावात येणार असल्याची जास्त खुशी त्यांच्या चेहऱ्यावर असते…गावापासून लांब रहायला कोणाला आवडेल? पण नाईलाजाने पोटापाण्यासाठी, पोरांच्या भविष्यासाठी गाव सोडावे लागते…त्यामुळे गावाला येतानाचा प्रवास हा ‘स्वर्गसुखा’पेक्षा कमी नसतो…अक्षरश:…मिळेल त्या वाहनाने, वेटींग तिकीट असतानाही रेल्वेच्या डब्यात पेपर टाकून खाली बसून , कामावरती कधी न सुट्टी घेणारा कोकणी माणूस गणपतीची 15 दिवस सुट्टी घेवून गावाक आवर्जून येतो…गावाकडील आपल्या कुटुंबासोबत चार दिवस आनंदाने राहतो…जुन्या मित्रांसोबत बालपणीच्या आठवणींमध्ये रमतो…
मुंबईवरून सजावटीची सहित्ये,मखर,तोरणे आवर्जून आणली जातात…तरुण-तरुणींसह लहान मुले देखील सजावटीत रमतात…तर असा हा कोकणचा आगळा-वेगळा गौरी-गणपती सण… म्हणूनच लग्न झालेल्या सासरवाशीण… आपल्या भावाला हाक मारत असते…गौरी-गणपतीच्या सणाला…बंधवा ये मना नेवाला…