Saturday, November 23, 2024
Homeपनवेल / उरण / रायगडखोपोली नगर परिषदेचे हाळ बुद्रुक कब्रस्तानाकडे दुर्लक्ष?...

खोपोली नगर परिषदेचे हाळ बुद्रुक कब्रस्तानाकडे दुर्लक्ष?…

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे) :- 

           खोपोली नगर परिषदेमध्ये असणारे हाळ बुद्रुक गावाच्या कब्रस्तानावर नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र कब्रस्तान पाहिल्यावर दिसून येत आहे… खोपोली नगर परिषद हद्दीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे… हाळ बुद्रुक गावाच्या कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीवर गेल्या काही महिन्याआधी भले मोठे झाड कोसळल्याने अनेक ठिकाणी भिंत कोसळली तर अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत… या दगडात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या दर्जाच्या कामाबाबत सुरवातीपासून मुस्लिम बांधवांमधून ओरड असताना त्याकडे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे… मात्र आता तुटलेली संरक्षण भिंत दुरुस्ती करण्यासाठी लेखी अर्ज करा असे मुस्लिम बांधवाना खोपोली नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता अनिल वाणी यांच्याकडून सांगण्यात आले आहे… अर्ज दिला नाही तर नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानची तुटलेली संरक्षण भिंतची व इतर कामंची दुरुस्ती करणा नाहीं का?असा प्रश्न उपस्थित करीत मुस्लिम बांधवांनी  नाराजी व्यक्त केली आहे… 

               गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानामध्ये लोखंडी शेडवर सिमेंटचे फुटलेले पत्रे, सडलेल्या  अवस्थेत असलेले लोखंडी बोर्ड, रूमचा कुजलेल्या अवस्थेत असलेला लाकडी दरवाजा, तुटलेले नळ आणि भयानक वाढलेले उंच गवत, जंगली झाडे संपूर्ण कब्रस्तानमध्ये झाल्याने कब्रस्तानमध्ये जाणे कठीण झाले आहे… नगर परिषदेचे सफाई कर्मचारी या कब्रस्तानमध्ये साफसफाई करण्यासाठी येत नसल्याने कब्रस्तानची अक्षरशः बिकट अवस्था झाली आहे… औषध फवारणी देखील केली जात नाही… या वाढलेल्या गवतामुळे मृतासाठी कबर खोदणे व दफन विधी करण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे… तुटलेल्या संरक्षण भिंतीच्या ठिकाणातून मोकाट जनावरे, भटके कुत्रे कब्रस्तानमध्ये शिरून कबरिंची नासधूस करतात… अनेकदा कबरमध्ये जनावरे अडकून पडतात आणि कबरींची   नादुरुस्ती होते…. 

             खोपोली शहराचा विकास करण्यासाठी खोपोलीकरांनी अर्ज दिल्यावर नगरपरिषदेकडून विकासकामे केली जाणार का? गेल्या काही महिन्याआधी नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून स्वच्छालय बांधले होते… मात्र रातोरात श्रीमंत माफियांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत स्वच्छालय भुईसपाट केले… अनेकांनी तक्रारी केल्या… वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या मग नगर परिषदेने फौजदारी गुन्हा दाखल करून कोणती कारवाई केली का? अर्ज केले नाही तर खोपोली शहराचा विकास होणारच नाही का? आंदोलन, उपोषण, जलसमाधी,आत्मदहन इशारा दिल्यानंतरच खोपोली नगर परिषचे बांधकाम विभागाचे अभियंता कब्रस्तानाची संरक्षण भिंत व इतर दुरुस्तीची कामे करणार का? खोपोली नगरपरिषदेला जाग येणार तरी कधी? नागरिकांना सुविधा मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल खोपोलीकरांचा आहे… 


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments